20191213 204006
ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची मागणी! विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पुढाकार

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची मागणी

  • विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पुढाकार

—————————-
लोकनेते दि. बा. पाटील हे प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे नेतृत्व आहेत. याची जाणीव महाराष्ट्राला आहे. पनवेल महापालिकाने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासाठी मागणी केली आहे. तसेच गरज भासल्यास जे. एम. म्हात्रे चारिटेबल संस्थेच्या माध्यमातून पालिकेला सहकार्य करू.
– प्रितम म्हाञे, विरोधी पक्षनेते.
पनवेल महानगरपालिका.
——————————

पनवेल/ प्रतिनिधी :
प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे नेते दि. बा. पाटील यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
सध्या शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला दिसून येत आहे. धन दांडग्या शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. या बिकट परिस्थितीत सरकारी शाळा एका पाठोपाठ एक बंद होत असल्याने तळागाळातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. भविष्यात तो अधिक बिकट होणार आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे. पनवेलचे झपाटयाने शहरीकरण होत असताना येथील दुर्गम भागातील खेडया पाडयातील तसेच महापालिका हद्दीतील राहणा-या गरीब कुटुंबतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही.
पालिकेच्या शाळेत पटसंख्या घसरत असून शाळा बाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. सध्या शाळेतील विद्यार्थी संख्या घटत चालल्याने पालिकेने याबाबत ठोस पावले उचलायला हवीत. यापूर्वी मुलींसाठी पालिकेत १० वी पर्यंत शाळा सुरु करण्याचा ठराव झाला होता. त्याचे पुढे काय झाले हे ठाऊक नाही. पनवेल पालिका हद्दीतील मुलींसाठी पालिकेने १२ वी पर्यंत शिक्षण दिले पाहिजे असे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे म्हणणे आहे. येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रोत्साहन द्यायला हवे. पालिकेच्या शाळांमध्ये प्रयोगशाळा, वाचनालये, वृत्तपत्रे वाचनालये, ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण देणारे शिक्षक, क्रीडा व संगीत प्रशिक्षण देणारे शिक्षक हवेत. सद्यस्थितीत पालिका हद्दीत कुपोषित बालके आहेत का ? याची सुद्धा पालिकेने पाहणी करायला हवी.
त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भावीतव्या अंधारात असल्याने याबाबत पालिकेने या विद्यार्थ्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शिष्यवृत्ती योजना तयार करण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

7 thoughts on “लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची मागणी! विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पुढाकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

51 − 50 =