माजी उपसभापती जयवंती हिंदोळा यांच्याकडून ६० आदिवासी महिलांना साडी वाटप…
कर्जत/ मोतीराम पादीर :
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील हाऱ्याचीवाडी ६० घराची लोकवस्ती असलेल्या आदिवासी वाडीतील महिलांना माजी उपसभापती जयवंती हिंदोळा त्याचे पती दत्तात्रय हिंदोळा या दोघांच्या नियोजनातून ठरवून त्याच्या सोबत वारे ग्रामपंचायत सरपंच योगेश राणे, मोग्रज ग्रामपंचायत उपसरपंच शिवाजी सांबरी, कळबं ग्रामपंचायत माजी सदस्या निलम ढोले, सामाजिक कार्यकर्ते बबन बालेराव, मालू पारधी, वसंत ढोले, मोतीराम पादीर, निर्मला पादीर, अरुणा सांबरी, किरण कडाळी, हनुमान सराई, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हाऱ्याचीवाडीतील ६० महिलांना साडी वाटप करण्यात आले. तसेच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
माजी उपसभापती जयवंती हिंदोळा, दत्तात्रेय हिंदोळा या दोन्ही पती पत्नी आपल्या समाजात उल्लेखणीय कार्य करत असून आदिवासी समाजाची जाण असलेल्या या जोडीने समाजासाठी अनेक सामाजिक कामे केली आहेत.
तसे आदिवासी वाडीतील महिला बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, अनेक बचत गटांना साहित्य मिळवून देणे, तसेच अनेक आदिवासी वाडी वस्तीला जाऊन साडी वाटपाचा कार्यक्रम, आरोग्य शिबीर लावणे,मराठी शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे अनेक तरुणांना टि र्शट देणे, गरीब गरजूंना मदतीची गरज लागली तर हात पुढे करणारे, अशा अनेक सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे हे दोघे सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल नाव समाजात रोवत आहेत.या दोन्ही व्यक्ती आपल्या समाज कार्यामुळे सर्वत्र चर्चत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. अश्या व्यक्ती समाजात असणे गरजेचे आहे. असे अनेक लोकांन कडून बोलले जात आहे.
———————
आम्ही दोघे या आदिवासी समाजाचे काय तरी देणे लागत आहोत म्हणून आम्ही समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करत असतो.आम्ही स्वखर्चने समाज कार्य करत असताना यातच आम्हाला समाधान मिळत आहे. समाजा कडून आम्हाला मिळालेले प्रेम त्याची परतफेड म्हणून छोटे मोठे समाज कार्य करून करत आहोत. या समाज कार्यातून तुमच कडून मिळालेले प्रेम तुमच अर्शिर्वाद हेच आमच्या कार्याची पोच पावती आहे.
– जयवंती दत्तात्रय हिंदोळे.
माजी उपसभापती, कर्जत
– दत्तात्रय महादू हिंदोळे
सामाजिक कार्यकर्ते
———————–