20200712 141515
कर्जत कोकण ताज्या नवी मुंबई नेरळ महाराष्ट्र रायगड सामाजिक

नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

● आदिवासी संघटना झाल्या आक्रमक ●

 

————————
कर्जत तालुका आदिवासी कातकरी, ठाकूर संघटना आक्रमक झाली आहे. आमच्या समाजातील व्यक्तीची बदनामी करणारे आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ करणा-यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आदिवासी संघटना आंदोलन करेल.
– भरत शिद, अध्यक्ष
कर्जत तालुका आदिवासी कातकरी, ठाकूर संघटना.
—————————

नेरळ/ प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणा-या ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा हे आदिवासी समाजाचे आहेत. हे माहित असताना देखील सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शब्दात बोलून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच नेरळ शिवसेनेचे माजी शहरप्रमुख यांच्यावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नेरळ शिवसेनेमधील वाद चिघळला आहे.
2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंच पद हे अनुसूचित जमाती राखीव होते, या पदासाठी निवडणूक लढविणारे रावजी शिंगवा यांनी बाजी मारून विजय मिळवला होता. रावजी शिंगवा हे सुशिक्षित व अभ्यासू असून त्यांनी अनेक संस्था, संघटनामध्ये काम केले आहे. त्यामुळे रावजी शिंगवा यांना समाजकार्याबरोबर राजकीय कारभारचा अधिक अनुभव आहे. माञ, नेरळ ग्रामपंचायतमध्ये काम करताना आपल्याला विचारले पाहिजे आणि काम केले पाहिजे अशी माजी उपसरपंच केतन सुभाष पोतदार यांची अपेक्षा होती. परंतु, प्रशासनाचा अनुभव पाठीशी असलेले रावजी शिंगवा यांना थेट सरपंच म्हणून नेरळ ग्रामस्थांनी मतदान केल्यामुळे सरपंच यांनी स्वतंत्रपणे आपल्या पदावरून कारभार सुरू केला. त्यामुळे माजी उपसरपंच पोतदार यांच्या मनात खदखद होती. याचाच राग म्हणून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांना जातीवाचक उच्चार करत त्यांची बदनामी केली.
त्याचवेळी गावातील एका रस्त्याचा प्रश्‍न सध्या चर्चेत असून या रस्त्याबाबत आपली भूमिका मांडणारे अजित तानाजी सावंत यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या बाबतीत ५ जुलै रोजी सोशल मीडियावर स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला मजकूर प्रसिद्ध केला होता. एकेरी भाषेत उल्लेख करत सरपंच रावजी शिंगवा त्यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून अजित सावंत यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हे पत्र बदनामी करणारे असल्याने त्याविरूद्ध ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांनी आक्षेप घेतला. व सरपंच रावजी शिंगवा यांनी ६ जुलै रोजी कर्जत येथील रायगड पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांची भेट घेऊन केतन सुभाष पोतदार आणि अजित तानाजी सावंत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलीस उपअधीक्ष अनिल घेरडीकर, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक तात्या सावंत यांच्या सोबत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करत ६ जुलै रोजी ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांना सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याबद्दल केतन सुभाष पोतदार यांच्यावर आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडिया प्रसिद्ध केल्याबद्दल अजित तानाजी सावंत यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१५ चे कलम ३(१) आरएमयु सह भादंवि कलम ५००, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 1 = 5