Img 20201009 Wa0008
कर्जत ताज्या सामाजिक

आदिवासी भागातील भाजीपाला विक्रेत्यावर उपासमारीची वेळ

आदिवासी भागातील भाजीपाला विक्रेत्यावर उपासमारीची वेळ

कर्जत/ मोतीराम पादिर :
कर्जत तालुक्यात मोठया प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यात असून आदिवासी समाज पावसाळ्यात प्रामुख्याने मोलमजुरीसह वांगी, सिराळे, कारली, भेंडी, दुध्या, भोपळी, मिरची, पडवळ, दोडके, रताळे अशी अनेक भाजीपाला मोठया प्रमाणात करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो.
परंतू कोविड १९ च्या प्रार्दुभावामुळे भाजीपाला विक्रीसाठी नेरळ, कर्जत, कल्याण, ठाणे या मोठया शहरात जाता येत नसल्याने केलेला भाजीपाला पर्यायाने रस्त्यावर बसून विकावा लागत आहे. रस्त्यावर बसून क्वचितच रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या अर्धा किलो, एक किलो, काही गाडीवाले भाजी घेतात, पर्यायाने सर्वच भाजी विक्री होत नसल्याने शिल्लक राहिलेली भाजी फेकून दयावी लागते. मोलमजुरीही मिळत नसल्याने आदिवासी भाजी विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन आदिवासी भागातील भाजीविक्रेत्यांना आर्थिक मदतीचे सहकार्य करावे अशी भाजी विक्रेत्या लोकांकडून मागणी होत आहे.