Img 20190815 Wa0004
महाराष्ट्र मुंबई रायगड

खातेफोड व आदिवासी जमीनीवर असलेला बोजा कमी करण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्यावतीने कर्जत तहसीलदारांना दिले निवेदन

खातेफोड व आदिवासी जमीनीवर असलेला बोजा कमी करण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्यावतीने कर्जत तहसीलदारांना दिले निवेदन….

कर्जत/प्रतिनिधी :
आदिवासी जमीनीवर असलेला बोजा, अनेक वर्षांपासून आसलेल खातेफोड व 7/12 वर असलेले सोसायटीचे बोजा व तगाई या सर्व गोष्टी होण्यासाठी कर्जत तहसीलदार यांना आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीने बुधवार (दि.14 ऑगस्ट) रोजी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शासन व महसूल वनविभाग यांचेकडील परिपञक क्र/जमिन 07/2014 प्र.क्र. 130/ज 1 दिनांक 16/07/2014 मध्ये महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 चे निकषाप्रमाणे शेतजमिनीच्या विभाजनबाबत तरतुदी देण्यात आले आहेत, त्या अनुषंगाने मा. विभागीय कोकण आयुक्त यांचेकडील परिपञक दिनांक 20/06/2017 अन्वये या कार्यालयाकडून अनुसूचित क्षेञातील व्यक्तींची खोतेफोड करणेबाबत मोठ्या प्रमाणात आपले सजेतील विविध गावामध्ये मोहीम स्वरूपात सुनावणी घेवून या आदिवासी खातेदारांचे जमिनीची खोतेफोड करणेकामी प्रकरणे प्राप्त करून घेतली होती. त्यावर या कार्यालयाकडून खोतेफोड बाबतचे आदेश पारित करण्यात आले होते. व उर्वरित प्रकरणामध्ये असे निदर्शनास आले होते की, सुमारे 5 ते 6 वर्षापासून वारसनोंद मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याने ते आपणास तपासकरून करणेबाबतच्या वारंवार लेखी व आढावा सभेमध्ये सुचना देण्यात आल्या असताना सुद्धा आपलेकडून वारसनोंदी करण्यात प्रलंबित आहेत. या लवकरात लवकर आदिवासींच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज या संघटनेने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
कर्जत तहसीलदार यांनी या निवेदनाचे दखल घेऊन शेतजमिनीची खातेफोड करण्यासाठी मोहीम स्वरूपात वाचन करण्यासाठी नांदगाव, कशेळे, आंबिवली, खांडस, सुगवे, पाषाणे, कळंब, कोठींबे, वारे या तलाठी सजा मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पादीर, चाहू सराई, जैतू पिरकड, काशिनाथ पादीर, धर्मा निरगडे, गोविंद ठोंबरे, मोतीराम पादीर, काळू वारघडे, प्रकाश बांगारे, भरत पादीर, महादू शेंडे, कृष्णा हिंदोळे तसेच कर्जत तालुक्यातील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

One thought on “खातेफोड व आदिवासी जमीनीवर असलेला बोजा कमी करण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्यावतीने कर्जत तहसीलदारांना दिले निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 1 =