- राजे प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी करण्यात आली जीवनावश्यक वस्तूंची मदत.
- १० हजार कुटुंबांना मिळाली मदत.
राज भंडारी/ पनवेल :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठानचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद आहे, मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवलेल्या सांगली, कोल्हापूरसह परिसरातील भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याठिकाणी असणाऱ्या नागरिकांचे संसार डोळ्यादेखत उध्वस्त झाले असून रविवारी त्यांना राजे प्रतिष्ठान मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तू तसेच वस्त्र व इतर समान देण्यात आले. शनिवारी रात्री मुंबईमधून एकूण ३ ट्रक भरून सामान सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तसेच आष्टा तालुक्यातील कुटुंबांना ही मदत देण्यात आली. यावेळी १० हजार कुटुंबांपर्यंत ही मदत गेली असल्याचा आकडा पार झाल्याचे समोर आले आहे.
राजे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नितीनदादा शिंदे असून महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, राजू मरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके उर्फ मामा, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली राजे प्रतिष्ठानचे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड येथील पदाधिकारी आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करून येथील मनाने खचलेल्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी राजे प्रतिष्ठानचे मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके उर्फ मामा, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, मुंबई सचिव संजय गुप्ता, नवी मुंबई अध्यक्ष संदीप बागडे, उपाध्यक्ष अजय साळुंखे, महाराष्ट्र महिला संघटक प्रमुख स्वाती बागडे, नवी मुंबई महिला कार्याध्यक्षा अर्चना पार्टे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल उंब्रटकर, प्रसाद तुपे, रोहन तांबे, अनिकेत काटे, मयुरेश उंब्रटकर, अमित घाटे, आकाश खाटपे, अक्षय सूर्यवंशी, गणेश पवार, उदय चोप्रा, रितेश गावडे, विकी राणे, प्रीतम भोसले, सयाजी चव्हाण, भुषण मोरे, नवी मुंबई सल्लागार आनंद सोनावणे, विशाल कटके, अमोल डांगे, विजय लोहार, सुनील वरेकर, पिंट्या तुपे, राज भंडारी, भूषण गजरे, किरण पालये, राजू, शंकर, अनिकेत आदींसह एकूण ८० पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पुरामध्ये येथील कुटुंबांचे कपडे, जिन्नस सामान, सौन्दर्य प्रसाधने आदीसह घराचेही मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन नुकसान झाले असल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंची गरज मोठ्या प्रमाणावर उद्भवली आहे. त्यामुळे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांचे यावेळी अनमोल मार्गदर्शन राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना लाभले. महाराष्ट्रातील या जनतेवर कोसळलेल्या आपत्तीचा सामना त्यांना मदत करून करण्याचे धाडस यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून मदत मोठ्या प्रमाणावर सुरीच असली तरी गावेच्या गावे पाण्याखाली गेल्यामुळे आपत्तीही तितकीच मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांनी या पूरग्रस्त भागात आपली मदत पोहोचविण्याचे आवाहन राजे प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी इस्लामपूर तालुक्यातील योगधाम येथे १००, उरूण नाट्यगृह येथे ३४०, बोरगाव, मसूची वाडी, फनवाडी, गौडवाडी, बनेवाडी, नवे खेड, जुने खेड, फारनेवाडी येथे जवळपास २५०० कुटुंबांना मदत दिल्यानंतर आष्टा तालुक्यातील गावांमधील कुटुंबे जी शहरातील शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती त्या जवळपास ४५०० कुटुंबांना यावेळी राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. यावेळी राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून ही मदत उभारत असताना ज्या संस्थांनी यावेळी वस्तूरूपाने मदत केली आहे त्यांचेही यावेळी संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले व तसेच या पूरात ज्यांचे छत हरपले आहे त्यांच्यासाठी पक्की घरे बांधून घेण्यासाठी विशेष सहाय्य मोहीम राबविणार असून ज्यांना आर्थिक मदत करायची असेल त्यांनी राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी केले.