IMG-20221105-WA0008
अलिबाग ठाणे ताज्या पनवेल मुंबई रायगड सामाजिक

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने…

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा

ठाणे/ प्रतिनिधी :
आदिवासी विचार मंचाच्या (प्रतिष्ठान) प्रयत्नांनी तसेच आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना, महाराष्ट्र आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान, शहापूर यांचे विशेष सहकार्याने आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्त येत्या 08 नोव्हेंबर 202‍2 रोजी राम गणेश गडकरी रंगायतन,ठाणे येथे सकाळी 09.30 ते दुपारी 02.00 वाजे पर्यंत विशेष टपाल पाकीट अनावर सोहळाचे आयोजन करण्यात येणार आहे.
IMG-20221105-WA0008या मेळाव्यास विशेष आतिथी म्हणून श्रीम. विणा श्रीनिवास, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, श्री. गणेश साबळेश्र्वरकर, पोस्टमास्तर जनरल, नवी मुंबई क्षेत्र, हे उपस्थित राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंसत पिचड,सह आयुक्त जी.एस.टी मुंबई उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व समाज बांधव,समाज संघटना, शैक्षाणिक , सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या संख्येंने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन लोकनेते सुनिल तुकाराम भांगरे यांनी एका प्रसिध्द पत्रकाद्वारे केले आहे.

adivasi logo new 21 ok (1)