20230102_085156
नवीन पनवेल पनवेल

आज उपसरपंच पदाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर

आज उपसरपंच पदाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर

20230102_085156नवीन पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल येथील दहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुका आज सोमवारी २ जानेवारी 2023 रोजी होणार आहेत. पनवेल तालुक्यातील करंजाडे, शिरढोण, शिवकर, चिंध्रन, दिघाटी, कानपोली, केळवणे, नेरे, भाताण, नितळस या ग्रामपंचायतसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. तर २० डिसेंबर रोजी निकाल लागला यातून थेट सरपंच निवडण्यात आले. मात्र उपसरपंच पद हे निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे सदस्यांचे बहुमत नाही अशा ग्रामपंचायतीत बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. उपसरपंच निवडणुकीत उमेदवारांना समान मते मिळाल्यास निर्णयक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असणार आहे. 

Calendar 2023png Adivasi Dindarshika