IMG-20230109-WA0006
ताज्या नवीन पनवेल पनवेल सामाजिक

प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न 

प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न 

पनवेल / प्रतिनिधी :
कै. पंढरीनाथ माया खुटले शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व जीवनगौरव पुरस्कार सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत धरणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
IMG_20230108_130520विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत केल्या गेलेल्या विविध स्पर्धा  आणि उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना व पालकांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच प्रकाश घाडगे, उपसरपंच नीलिमा पाटील, शैलेश जाधव, वंदना रोडपालकर, संस्थापक धनंजय खुटले, पत्रकार मयूर तांबडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 

Calendar 2023 Adivasi png

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध प्रकारची लोकनृत्ये सादर करण्यात आली. विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर करून विद्यार्थी कलाकारांनी सोहळ्याची रंगत वाढविली.  शालेय विद्यार्थ्यांमधे आत्मविश्वास व सांघिक भावना वाढावी तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरांची ओळख लोककलेच्या माध्यमातून रुजवावी यासाठी या उद्देशाने हा कार्यक्रम संपन्न झाला.