डोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “ माथेरान/ प्रतिनिधी : मुंबई पुणे या सर्वत्र शहरीकरण झालेल्या कंपन्या, कारखाने आणि मोटार गाड्यांच्या कार्बनयुक्त प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या कर्णकर्कश आवाजांच्या नेहमीच्या गोंगाटातून क्षणभर मनाला उभारी मिळण्यासाठी, अंतर्मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी सध्यातरी मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे आणि उंच डोंगर माथ्यावर प्रस्थापित केलेले अविस्मरणीय ठिकाण म्हणजे अर्थातच माथेरान होय. […]
सामाजिक
माथेरानमध्ये पर्यटकांची दिशाभूल थांबिवण्यास पालिका सरसावली! माथेरान पोलिसांनीही घेतली कठोर भूमिका माथेरान/ मुकुंद रांजाणे : माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका येथील वाहनस्थळावर पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या त्याची दखल घेताना माथेरानच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा सावंत यांनी स्वतः ह्याची शहानिशा करताना त्यात तथ्य आढळल्याने माथेरान पालिकेतर्फे मुख्याधिकारी श्री.रामदास कोकरे यांनी जिल्हाधिकारी तसेच रायगड पोलीस […]
सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केल्याने उत्पन्नाचे साधन..! गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर करता येते मात
सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केल्याने नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन.. गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर करता येते मात. माथेरान/ प्रतिनिधी : माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने इथे पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या त्याचप्रमाणे अन्य मद्याच्या काचेच्या बाटल्यांचा खच गावातील गटारात आणि कचराकुंडीत इतस्ततः पडलेला असायचा. त्यामुळे मागील काळात इथे सर्वत्र अस्वच्छता […]
एसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा ! महापालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी
एसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा ! विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल शहरातील उरण नाका येथील बसथांबा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उन्हा – पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे जुना बस थांबा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून पालिकेकड़े करण्यात आली आहे. पनवेल […]
स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून क्रांतिवीर वासुदेव फडकेंच काम…. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीचे आमंत्रण मिळाले हेच भाग्य – अभिनेते महेश कोठारी
स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून क्रांतिवीर वासुदेव फडकेंच काम क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर मालिका तयार करण्याचा विचार सुरू असताना त्यांच्या जयंतीचे आमंत्रण मिळाले हेच भाग्य – अभिनेते महेश कोठारी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून आद्य क्रांतिवीर वासुदेव फडकेंनी काम केले. क्रांतिवीरांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी संघटना काम करीत आहे. गेल्या काही […]
गोर गरीब व आदिवासी वाड्यांवरील मुलांसाठी मोफत ” सर्कस शो “
गोर गरीब व आदिवासी वाड्यांवरील मुलांसाठी मोफत ” सर्कस शो “ राजे प्रतिष्ठानच्यावतीने १२ नोव्हेंबर रोजी आयोजन. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेलमध्ये सध्या ” द ग्रेट भारत सर्कस ” अवतरली असल्यामुळे करमणुकीचा आनंद घेण्यासाठी पनवेलमधील नागरिक मोठ्या उत्साहात सर्कसकडे वळत आहेत. यावेळी पनवेलमधील गोर गरीब व आदिवासी वाड्यांवरील मुलांच्या चेहऱ्यावरही हसू फुलावे या हेतूने या लहानग्यांना […]
…आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली! आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव.
आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव जव्हार/प्रतिनिधी : शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे धान्य हमी भावात खरेदी केले जाते, या धान्यांची भरडाई करून रेशनवर दिले जाते, यात आतापर्यंत ठाणे पालघर मध्ये केवळ भात (धान) खरेदी केला जात होता. या भागातील शेतकरी पिकवतो आणि खातो अशा नागली (रागी) या […]
प्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल.
प्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल. खऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी सज्ज व्हा- विवेक पंडित उसगाव/ प्रतिनिधी : 1982 साली स्थापन केलेल्या श्रमजीवी संघटनेला आज 37 वर्ष पूर्ण झाली. विवेक आणि विद्युलता पंडित या ध्येयवादी दाम्पत्याने आपल्या तारुण्यात लावलेले हे इवलेशे रोपटे आज लाखभर लोकांचे कुटुंब असलेले महाकाय वटवृक्ष झाले. यानिमित्त […]
ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप…
मानवी जीवनात शाळे इतकेच वाचनालयाचे महत्त्व असावे ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप. माथेरान/ चंद्रकांत सुतार : वाचन करतात मात्र, वाचनाची पद्धत बदलत चाललीय व्हॉटअप, इंटरनेट ब्लॉग यांच्या माध्यमातून आजची तरुण पिढी स्वतःचे विचार व्यक्त, व वाचत आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघत आपले विचार मते व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मूळ घटना काय […]
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..!
शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुणे जिल्हा कमिटीने दिले जिल्हा अधिका-यांना निवेदन पुणे/ प्रतिनिधी : परतीच्या पावसामुळे पुणे जिल्हाच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने पंचनामे करून शेतक-यांना लवकरात लवकर आथिर्क मद्दत करा. अशी मागणी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या पुणे […]