Img 20201218 Wa0052
कर्जत ताज्या सामाजिक

कर्जत नगरपरिषदने संजयनगर येथील शौचालयाची केली दुरुस्ती

कर्जत नगरपरिषदने संजयनगर येथील शौचालयाची केली दुरुस्ती

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे मानले नागरिकांने आभार !

कर्जत/ मोतीराम पादिर :
कर्जत नगर परिषद हद्दीतील संजयनगर येथील कॉलेज रोड लगत असलेल्या शौचालयांची खूपच दुरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे हे शौचालये दुरुस्त करण्याची मागणी सातत्याने होत असता येथील नगरसेवक गटनेते शरदभाऊ लाड , सौ. सुवर्णा निलधे, व संकेत भासे यांच्या मागणीनुसार कर्जत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांनी पुढाकार घेऊन तातडीने दखल घेवून शौचालये दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून पालिकेचे आभार प्रकट केले आहे.
स्वच्छ कर्जत – सुंदर कर्जत , हे स्वप्न उराशी बाळगून कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी ह्या प्रत्येक प्रभागात जातीने लक्ष ठेवून आहेत . पालिका हद्दीतील संजयनगर येथील शौचालयाच्या झालेल्या दुरावस्थाची नागरिकांच्या तक्रारीची तातडीने तेथील गटनेते शरदभाऊ लाड, नगरसेविका सौ.सुवर्णा निलधे व नगरसेवक संकेत भासे यांनी दखल घेऊन पालिकेकडे शौचालय दुरुस्तीची केलेल्या मागणी मान्य करत नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी यांच्या पुढाकाराने सात लाख पन्नास हजार खर्च करून शौचालये सुधारण्यात आले.
सदर शौचालय दुरुस्ती कामाची पाहणी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, पालिकेचे विरोधी पक्षनेते तथा गटनेते शरदभाऊ लाड, नगरसेविका सौ. सुवर्णा निलधे, नगरसेवक संकेत भासे, नगर अभियंता मनिष गायकवाड, कनिष्ठ अभियंता निलेश चौडिये, व ठेकेदार सौरभ केदारी यांनी केली .

One thought on “कर्जत नगरपरिषदने संजयनगर येथील शौचालयाची केली दुरुस्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + 7 =