IMG-20221104-WA0001
कर्जत कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

शासकीय अधिकाऱ्यानेच चोरली माती? … राखणदारच घर भरू लागला | वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?

शासकीय अधिकाऱ्यानेच चोरली माती?

राखणदारच घर भरू लागला | वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?

कर्जत / प्रतिनिधी :
गुरचरण, गावठाण यांसह शासकीय मालकीच्या जागांची राखणदारी करण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे. ऐवढेच नव्हे तर दगड-माती आदी गौण खनिजांची होणारी अवैध वाहतूक रोखून शासनाला जास्तीत जास्त महसूल मिळवून देण्याची जबाबदारी देखील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. पण मुळात कर्जत तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यानेच माती चोरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
IMG-20221104-WA0002याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्जत तालुक्यात उच्च पदावर असलेल्या एका शासकीय अधिकाऱ्याने जवळजवळ 29 गुंठे जागा विकत घेतली आहे. दरम्यान, सदर 6 गुंठे जागेत दिवाळीच्या आसपास अधिकाऱ्यांकडून भराव करण्यात आला आहे. सदर अधिकाऱ्याच्या मालकीच्या जागेत गावठाणातून शेकडो ब्रास माती उत्खनन करून भराव करण्यात आला आहे. ज्या शासकीय अधिकाऱ्यांवर शासनाच्या जमीनीची राखणदारी करायची जबाबदारी आहे, त्यांनीच चोरी केल्यावर जनतेने काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

adivasi logo new 21 ok (1)
कर्जत उपविभागीय अधिकारी, कर्जत तहसिलदार याचा पाठपुरावा करणार का? माती चोर अधिकाऱ्यांचा शोध लागणार का? गावठाणात उत्खनन करून भराव करणाऱ्यावर कार्रवाई होणार का? असा प्रश्न गावकऱ्यांकडून विचारला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी योग्य ती माहिती घेवून पुराव्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येईल. तसेच गरज पडल्यास मातीचोर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा गावकरी व पोलीस मित्र संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.