शेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्या पनवेल/प्रतिनिधी : शेतकरी कामगार पक्ष पनवेल व पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून फ्लिपकार्ट कंपनीसाठी पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली भागात डिलिव्हरी बॉयकरिता १६ सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० जणांना डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी मिळाली आहे. फ्लिपकार्ट […]
महाराष्ट्र
गड- किल्ले विकू देणार नाही…
गड- किल्ले विकू देणार नाही संगमनेर तालुक्यातील पेमगिरी – शहागड येथे शिवप्रेमी भक्तांचा गडावर राबवली स्वच्छता मोहीम. संगमनेर/ प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने गड – किल्ले लीज वर देण्याचा म्हणजे एक अर्थाने विकण्याचाच निर्णय घेतला आहे. ज्या गडकिल्यांवर स्वराज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडले त्याच गडकिल्ल्यांवर सरकारच्या नवीन धोरणानुसार लग्नसमारंभ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार. ज्या गडकिल्ल्यांवर कुणी जोडपी […]
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण…
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण.. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण भवनासाठी सामाजिक संस्था- संघटनानी सिडकोकडे केला पाठपुरावा. कळंबोली/ प्रतिनिधी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन गरीब जनतेच्या उपयोगात येवून त्यांना दिलासा मिळाला या उद्देशातून उभारण्यात आलेले आहे. या महामानवाच्या भवनाचे लोकार्पण माझ्या हातून होते ही एक गौरवाची बाब आहे. आज या भवनाचे […]
शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व- आमदार जयंत पाटील
शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. ——— प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व ——- ———————————————– राजकारणात चढ उतार येतात. हार पराजय होत असते. परिस्थिती बदलत असते. शेकाप हा निष्ठावंत कार्यकर्यांचा पक्ष आहे हे इथल्या कार्यकर्त्यांची आजवर दाखवून दिले आहे. पनवेलमध्ये शेकापचा दबदबा आजही कायम आहे. भविष्यात सुद्धा राहणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. […]
संविधान व एस.सी / एस.टी. चे आरक्षण कोणीही बदलू शकत नाही
संविधान व एस.सी / एस.टी. चे आरक्षण कोणीही बदलू शकत नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई/ प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुती चे सरकार निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या विधानसभा निवडणुकित रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वासाचा शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या […]
पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचा मनमानी कारभार…
पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचा मनमानी कारभार रास्त धान्याची संगनमताने होतंय विल्हेवाट —————————————- पनवेल तालुक्यातील रास्त धाऩ्य व राँकेल दुकानात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून राज्य शासनाच्या आधार लिंक योजनेचा पुरेपूर फायदा या कार्यालयातून घेतला जात आहे. ज्या कार्डधारकांची कार्ड लिंक झाली नाही, त्यांच्या धान्याची या कार्यालयातून थम मारून रास्त धान्य दुकानदार व अधिकारी परस्पर विल्हेवाट लावत […]
लोकप्रतिनिधीचे संपादक गणेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी गौराईचा उत्सव
लोकप्रतिनिधीचे संपादक गणेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी गौराईचा उत्सव पेण/ प्रतिनिधी : साप्ताहिक लोकप्रतिनिधीचे संपादक श्री. गणेश म्हात्रे पेण यांच्या सोनखार येथे निवासस्थानी गौराईचे विधीवत आधिष्ठान करुन पुजन, भजन, नामस्मरणादी कार्यक्रमासह उत्साहपूर्ण वातावरणात उत्सवातील आनंद द्विगुणीत केला . सृष्टीला चैतन्य, वैभवसंपन्न, समृद्धीचे वरदान देणाऱ्या अदिशक्ती गौराईच्या उत्सव सोहळा म्हात्रे कुटुंबिंयासाठी प्रतिवर्षी पर्वणीच असते. पारंपारिक पध्दतीचे फेराचे […]
तालुका पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांमध्ये करण्यात आली जनजागृती
तालुका पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांमध्ये करण्यात आली जनजागृती पनवेल/ प्रतिनिधी : गणेशोत्सवाचे औचित्य साधून पनवेल तालुका पोेलीस ठाण्याचे वपोनि अशेाक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ व त्यांच्या पथकाने सायबर क्राईम अभियान राबविले. यामध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पनवेल तालुका मधील पोयंजे येथील वस्तुशीद्धी को.ऑ.हौ.सोसायटी गणेश मित्र मंडळ द्वारे गणेशोत्सव महोत्सवानिमिताने सायबर क्राईम […]
पनवेलचे उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार
पनवेलचे उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आणखी एक वचनपूर्ती रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिट पूर्णत्वास आले. रुग्णालयाच्या उभारणीपासून […]
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी…
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी.. पुणे/ प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येत असताना अजून भाजपा, शिवसेनेची युती होईल की नाही? असा प्रश्न चिन्ह निर्माण होवून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष तसेच त्यांच्या समविचारी पक्षांची आघाडी होईल की नाही? याचा ही कुठे अंदाज लागत नसल्याने या राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग […]